शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

दाभोलकरांच्या पुस्तकाची आॅनलाईन विक्रमी विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:37 IST

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या सुमन ओक अनुवादित इंग्रजी पुस्तकाची आॅनलाईनवर सर्वाधिक विक्री सुरू ...

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या सुमन ओक अनुवादित इंग्रजी पुस्तकाची आॅनलाईनवर सर्वाधिक विक्री सुरू आहे. शशी थरूर यांच्या ‘दी पॅराडॉक्सिकल प्राईममिनिस्टर नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ या पुस्तकासोबत दाभोलकर यांच्या या अनुवादित पुस्तकाची विक्री सुरू आहे.मूळत: मराठी भाषेतील तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सुमन ओक यांनी द केस फॉर रिजन-अंडरस्टँडिंग द अँटी सुपरस्टीशन मुव्हमेंट अशा नावाने केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आणि शास्त्रीय आधारावर मांडलेले विचार याचा या पुस्तकामध्ये समावेश आहे.प्रत्येक भारतीय नागरिकाने विज्ञानाच्या आधारावर आपली विचारक्षमता विकसित केली पाहिजे. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या चळवळीबाबतची माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. दोन खंडामध्ये हे पुस्तक उपलब्ध असून, पहिल्या खंडामध्ये अंधश्रद्धा चळवळ समजून घेणे आणि तर्कवादी आंदोलनाची सैद्धांतिक मांडणी समजून घेता येते. तसेच अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले विविध प्रयोग समजून घेता येतात.दाभोलकर यांची ईश्वराबाबतची संकल्पना आणि धर्माची भूमिका, वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच स्वतंत्र विचार आणि दृढ निश्चय कसा असावा, याबाबतची माहितीही या पुस्तकातून मिळते. विशेष म्हणजे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या शशी शरूर यांच्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया या पुस्तकाच्या बरोबरीने दाभोलकर यांच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाची विक्री सुरू आहे.याबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा विनाशाय, भ्रम आणि निरास, मती-भानामती, लढे अंधश्रद्धेचे, तिमिरातून तेजाकडे, अंध:विश्वास उन्मूलन विचार, अंध:विश्वास उन्मूलन आचार, एैसे कैसे झाले भोंदू, ठरलं डोळस व्हायचंय, विचार तर कराल या पुस्तकांचीही आॅनलाईनवर मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.इंग्रजी अनुवादित पुस्तकाला जगभरातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रीवरून दिसून येत आहे.